नवी दिल्ली -कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरामध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 100 टक्के यशस्वी करण्याची विनंती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सर्व राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना केली आहे. जर संचारबंदी यशस्वी झाली नाही, तर कोरोना विरोधातील लढाई लढण्यास अवघड जाईल, असा इशारा त्यांनी दिली आहे.
लॉकडाऊन 100 टक्के यशस्वी करा, अन्यथा... - भारत बंद
24 मार्चला देशभरात 21 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, अजूनही कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला नाही. त्यामुळे अनेक राज्यांनी संचारबंदी वाढविण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
24 मार्चला देशभरात 21 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, अजूनही कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला नाही. त्यामुळे अनेक राज्यांनी संचारबंदी वाढविण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्याशी संवाद साधणार आहेत. त्यावेळी संचारबंदी वाढणार की नाही यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच पंतप्रधान सर्व राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
भारतामध्ये कोरोनाचे 5 हजार 709 रुग्ण आढळून आले आहेत. तर 509 रुग्ण पूर्णत: बरे झाले आहेत. आत्तापर्यंत 199 जणांचा मृत्यू झाला आहे. संचारबंदीमुळे देशातील सर्व व्यवसाय आणि उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. जगभरामध्ये आत्तापर्यंत 15 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत.