नवी दिल्ली -केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक होणार असून काही महत्त्वाचे निर्णय बैठकीत घेतले जाण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी 7 लोक कल्याण मार्गावर ही बैठक होणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कोरोनाच्या संसर्गाचे वाढते प्रमाण आणि त्याचा अर्थव्यवस्थेला बसलेला फटका, कोरोना लस, लॉकडाऊन, चीन-नेपाळ- सिमावाद, बिहार-आसाम पूर, असे अनेक प्रश्नांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाची अखेरची बैठक 8 जुलैला पार पडली होती. त्यामध्ये व्यापारी आणि कर्मचार्यांच्या हितासाठी 24 टक्के ईपीएफ सहाय्य मंजूर करण्यात आले होते. तसेच स्थलांतरित मजूर, सर्वसामान्य नागरिक ते विमा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. तसेच कृषी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 1 लाख कोटी रुपयांचा अॅग्री इन्फ्रा फंड मंजूर करण्यात आला होता.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना तीन महिन्यापर्यंत करण्यात आली होती. त्यात वाढ करत योजना नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. या अतंर्गत 81 कोटी लोकांना 203 लाख टन धान्य वाटप केले जाईल.