नवी दिल्ली - देशांमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून, कोरोना विषाणूला रोखण्याचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५६२ झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठीच्या उपाययोजनावर चर्चा झाल्याची माहिती आहे. तर चर्चे दरम्यान मंत्री एकमेकांपासून अंतर राखून बसल्याचे पाहायला मिळाले.
कोरोनाचा कहर : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी राखले अंतर
देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५६२ झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मंत्री एकमेकांपासून अंतर राखून बसल्याचे पाहायला मिळाले.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी सामाजिक अतंर राखत एकमेकांपासून १ मिटर लांब राहण्याचे उपाय सुचवण्यात आले आहेत. त्याप्रमाणे आज केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत सर्व जण १ मिटर अंतर राखून बसले. मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
दरम्यान मोदींनी कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून ते येत्या १४ एप्रिलपर्यंत म्हणजेच 21 दिवस नागरिकांना जेथे आहे, तेथेच घरामध्ये थांबण्यास सांगितले आहे. महामारीमुळे २१ दिवस देश बंद ठेवण्याची ही देशातील पहिली वेळ आहे. कोरोनाला हरविण्यासाठी घरात राहण्याचा संकल्प करण्याचे आवाहन मोदींनी देशवासियांना केले आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून घराच्या बाहेर निघण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.