महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड..  मोदी सरकारकडून ३० लाख कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस - केंद्र सरकारचा दसरा दिवाळी बोनस

केंद्र सरकारने दसरा दिवाळीच्या तोडांवर सरकारी कर्मचाऱ्यांना एक खुशखबर दिली आहे. ३० लाख अराजपत्रित सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज कॅबिनेट बैठकीत घेतला.

FILE PIC
संग्रहित छायाचित्र

By

Published : Oct 21, 2020, 5:06 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारने दसरा दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. ३० लाख अराजपत्रित सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज(बुधवार) कॅबिनेट बैठकीत घेतला. कॅबिनेट मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सरकारच्या निर्णयाची माहिती दिली. 'डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर'द्वारे(डीबीटी) हे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहेत.

याआधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष 'फेस्टिवल अ‌ॅडव्हान्स' योजनेची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत सरकारी कर्मचारी अ‌ॅडव्हान्समध्ये १० हजार रुपये घेऊ शकतात.

३० लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा

केंद्र सरकारने २०१९-२० वर्षासाठी प्रोडक्टिव्हिटी आणि नॉन प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस देण्यास मंजूरी दिली आहे. याचा फायदा ३० लाख अराजपत्रित कर्मचाऱ्यांना होणार आहे. दसऱ्याच्या आधी ३० लाख कर्मचाऱ्यांना ३ हजार ७३७ कोटी रुपये बोनस देण्यात येईल, अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली.

बैठकीतील इतर महत्त्वाचा निर्णय

जम्मू काश्मीरातील जिल्हा पंचायतींच्या निवडणुका घेण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली. ३७० कलम रद्द करण्यात आल्यानंतर सर्व कायदे काश्मीरला लागू झाले आहेत. काश्मिरात ग्रामपंचायत, जिल्हा पंचायत स्तरावरील निवडणुका होणार आहेत. ही निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details