महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

श्रीनगरच्या नौगाम बायपासजवळ अज्ञात दहशतवाद्यांचा पोलिसांवर हल्ला, दोघांना वीरमरण - जम्मू-काश्मीर लेटेस्ट न्यूज

अज्ञात दहशतवाद्यांनी नौगाम बायपासजवळ पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या तीन पोलिसांपैकी दोघांना वीरमरण आले असून एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

unidentified-militants attacked-on police-party-near-nowgam-bypass-in-srinagar-district
प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Aug 14, 2020, 10:32 AM IST

Updated : Aug 14, 2020, 2:09 PM IST

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) - मध्य काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातील नौगम बायपासजवळ आज अज्ञात अतिरेक्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन पोलिसांना वीरमरण आले आहे, तर एका जखमी पोलिसावर उपचार सुरू आहेत.

श्रीनगरच्या नौगाम बायपासजवळ अज्ञात दहशतवाद्यांचा पोलिसांवर हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात दहशतवाद्यांनी नौगाम बायपासजवळ पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात तीन पोलीस जखमी झाले होते. त्यापैकी दोघांना वीरमरण आले असून एका पोलीस कर्मचाऱ्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू केली गेली आहे. दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवसाआधी हा हल्ला झाल्याने पोलीस सतर्क झाले आहे.

Last Updated : Aug 14, 2020, 2:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details