भोपाळ- मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्यामध्ये बस नदीमध्ये कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ३६ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. इंदोर येथून छत्तरपूरला जात असताना बस अनियंत्रित झाल्याने रीछन नदीवरील पूलावरुन खाली कोसळल्याने हा अपघात झाला.
हेही वाचा - गुजरातमध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसला भीषण अपघात, २१ ठार
अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तत्पूर्वी स्थानिकांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली होती. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने रात्री मदतकार्यात अडथळे येत होते. तसेच अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जखमींना रुग्णालयात नेताना हेही वाचा - मुंबई-पुणे महामार्गावर माडप बोगद्याजवळ खासगी बसचा अपघात; दोघींचा मृत्यू, 5 जखमी
रात्री दोन वाजता बस नदीवरील पुलाचे कठडे तोडून पाण्यात पडल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. खाली पडताच निम्मी बस पाण्यामध्ये बुडाली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.