नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्र (यूएन)च्या 75 व्या वर्षातील पदार्पणाच्या पूर्व संध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलैला भाषण देणार आहेत. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषद (ECOSOC)च्या उच्च-स्तरीय बैठकीच्या समारोप कार्यक्रमाला (Valedictory) पंतप्रधान मोदी व्हर्च्युल पद्धतीने संबोधीत करणार आहेत.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) मधील भारताला मिळलेल्या या वर्षाच्या विजयानंतरचे विश्वतील या मोठ्या मंचावर पंतप्रधान मोदींचे हे पहिलेच भाषण आहे. 1946 मध्ये ECOSOC चा प्रथम अध्यक्ष भारतच होता.