महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्ली हिंसाचार प्रकरणी उमर खालीदला अटक; दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई

फेब्रवारी महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटी दरम्यान ईशान्य दिल्ली हिंसाचार झाला होता. प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उमर खालीदला अटक केली आहे.

उमर खालीद
उमर खालीद

By

Published : Sep 14, 2020, 2:15 AM IST

Updated : Sep 14, 2020, 6:27 AM IST

नवी दिल्ली - ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालीदला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आहे. उमरवर बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंसाचार प्रकरणी त्याला रविवारी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. यावेळी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली असून त्याचा मोबाईल देखील जप्त करण्यात आला आहे.

आम आदमी पार्टीचा निलंबीत नगरसेवक ताहीर हुसैन याच्या विरोधात दिल्ली गुन्हे शाखेने चार्जशीट दाखल केली आहे. यात नमूद केल्या नुसार, हिंसाचाराच्या एक महिन्यापुर्वी ८ जानेवारीला ताहीर हुसैन, उमर खालीद आणि खालीद सैफी यांची भेट झाली होती. यावेळी उमरने ट्रम्प यांच्या भारत भेटीदरम्यान देशात मोठी दंगल घडवून आणण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

यानंतर फैब्रुवारी महिन्यात नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या आणि समर्थन करणाऱ्या दोन गटांत ईशान्य दिल्लीत मोठी दंगल उसळली होती. यात ५३ नागरिकांचा मृत्यू झाला होता. प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने हिंसाचार प्रकरणी तपास सुरू केला होता. या अंतर्गत आता उमर खालीदवर कारवाई करण्यात आली आहे.

Last Updated : Sep 14, 2020, 6:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details