महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'देशातील प्रत्येक राज्यातून काँग्रेसचा अंत होईल' - काँग्रेसचे अस्तित्व

उमा भारती यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसचे अस्तित्व संपल्यासह गांधी घराण्याचे वर्चस्वही संपले आहे, अशी टीका उमा भारती यांनी केली.

उमा भारती
उमा भारती

By

Published : Aug 24, 2020, 7:14 PM IST

नवी दिल्ली -उमा भारती यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसचे अस्तित्व संपल्यासह गांधी घराण्याचे वर्चस्वही संपले आहे. लखनऊमध्ये टांगा चालवणारेसुद्धा स्वत: ला नवाबाचे वंशज म्हणवतात, त्यांची नवाबी गेली असून ते आता टांगे चालवत आहेत. बऱयाच लोकांची सध्या काँग्रेसमध्ये तशी अवस्था आहे, अशी टीका उमा भारती यांनी केली.

उमा भारती यांचा काँग्रेसवर जोरदार निशाणा

हळूहळू, काँग्रेसचा शेवट होत आहे. बंगालमध्ये काँग्रेस संपली आहे. त्याच प्रकारे मध्य प्रदेशातही काँग्रेसचा अंत होत आहे. गेल्या 15 वर्षांपासून काँग्रेस राज्य बाहेर होती. पुन्हा फक्त 15 महिने आली निघून गेली. त्याचप्रमाणे देशातील प्रत्येक राज्यातून काँग्रेसचा अंत होईल, असे त्या म्हणाल्या.

घराणेशाहीच्या राजकारणापासून देश आता दूर झाला पाहिजे. तरच देशाचा विकास होईल. कारण, आम्हाला परदेशी गांधी नको असून स्वदेशी गांधींची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details