सीहोर - नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (सीएए) संपूर्ण देशात वादळ उठले आहे. यातच मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. सीएएचा विरोध करून काँग्रेस देशात १९४७ च्या विभाजनासारखी परिस्थिती आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, काँग्रेसचा हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे त्या म्हणाल्या. त्या सीहोर येथील प्राचीन मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी दिल्लीच्या शाहीनबागमध्ये सीएए विरोधात झालेल्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया दिली.
उमा भारती, ज्येष्ठ भाजप नेत्या उमा भारती म्हणाल्या, काँग्रेसने जनतेची दिशाभूल करत आहे. तसेच, शासकीय अधिकारीदेखील केंद्र सरकारवर टिप्पणी करत आहेत, जे असंवैधानिक आहे. असे म्हणत त्यांनी राजगड जिल्ह्यातील ब्यावरा येथे झालेल्या घटनेवर निंदा केली.
राजगड येथील घटनेवरून काँग्रेसवर प्रहार
उमा भारती म्हणाल्या, सीएए या कायद्याला संसदेच्या दोन्ही सदनात मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या कायद्याच्या समर्थनार्थ प्रदर्शन करणाऱ्या नागरिकांना प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून झालेली मारहाण ही चुकीची आहे. सीएएच्या समर्थनार्थ निघालेल्या जनतेला काही अधिकाऱ्यांनी मारझोड केली, अशा प्रकारची वर्तणूक ही असंवैधानिक आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री कमलनाथ आणि प्रमुख सचिवांनी अशा प्रकारे वागणाऱ्या अधिकाऱ्यांची समजूत काढावी असे निवेदन त्यांनी यावेळी केले. तसेच, शासकीय अधिकाऱ्यांनी जनतेवर हात उचलण्याची आणि नेत्यांना डाकू, घोटाळेबाज म्हणण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे म्हणत त्यांनी राजगड येथील घटनेवर माजी राज्यमंत्री बद्रीलाल यादव यांनी केलेल्या विधानाला चुकीचे म्हणात प्रतिक्रिया दिली.
आरएसएस प्रमुख यांना म्हणाल्या देव
राष्ट्रीय स्वयंवक संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या जनसंख्या नियंत्रणाच्या विधानाचे उमा भारती यांनी समर्थन केले आहे. आपण सरसंचालक यांना देव मानत असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या. भारताची लोकसंख्या ही एक मोठी समस्या असली तरी हीच आपली ताकददेखील आहे. मात्र, त्याकरता प्रत्येकाच्या हातात रोजगार असायला हवा, असेही त्यांनी नमूद केले.