देहराडून -हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या, उत्तराखंडमधील 'हर की पौडी' घाटावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना आलेल्या एका निनावी फोन कॉल नंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
९ नोव्हेंबरला दुपारी ३.३० च्या सुमारास त्रिवेंद्र सिंह यांना एक निनावी फोन आला. हर की पौडी घाटाला बॉम्बने उडवण्याची धमकी या फोनकॉलद्वारे देण्यात आली होती. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून घाटाची सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती, हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक सेंथिल अवुदाई कृष्णा राज यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांचे शिष्टाचार अधिकारी यांनी हा फोन उचलला होता, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाचार अधिकाऱ्याने तातडीने याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घाटावरची सुरक्षा वाढवत, तपासाला सुरुवात केली. तसेच, हरिद्वारच्या रेल्वे स्थानक आणि बस स्थानकावरही अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची चौकशी आणि तपासणी सुरु आहे, अशी माहिती कृष्ण राज यांनी दिली.
हरिद्वारमधील 'हर की पौडी' घाटाला बॉम्बने उडवण्याची धमकी, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना निनावी फोन... - हर की पौडी बॉम्ब धमकी
९ नोव्हेंबरला दुपारी ३.३० च्या सुमारास त्रिवेंद्र सिंह यांना एक निनावी फोन आला. हर की पौडी घाटाला बॉम्बने उडवण्याची धमकी या फोनकॉलद्वारे देण्यात आली होती. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून घाटाची सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती, हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक सेंथिल अवुदाई कृष्णा राज यांनी दिली आहे.
Har ki Pauri Ghat bomb threat