नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंग्लंडमधील सार्वत्रिक निवडणुकांमधील विजयासाठी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे अभिनंदन केले. त्यांच्या हुजूर पक्षाने निवडणुकीत बहुमत मिळवले. यानंतर मोदींनी त्यांना शुभेच्छा देतानाच भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यानचे संबंध अधिक मजबूत होतील, अशी आशा व्यक्त केली.
बोरिस जॉन्सन प्रचंड बहुमताने विजयी, पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन - pm modi congratulates boris johnson
'पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना त्यांनी पुन्हा एकदा प्रचंड बहुमत मिळवल्याबद्दल खूप-खूप शुभेच्छा. मी त्यांच्या पुढील कार्यासाठी सदिच्छा व्यक्त करतो. पुढील काळात भारताचे इंग्लंडसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील,' असे ट्विट मोदींनी केले आहे.

जॉन्सन यांच्या हुजूर पक्षाने शुक्रवारी निवडणुकीत प्रचंड बहुमतासह विजय मिळवला. आता ते ब्रेग्झिटमधून बाहेर पडण्यासाठीचे प्रयत्न सुरूच ठेवतील. तसेच, या विषयावर पुन्हा सार्वमत घेण्याच्या शक्यताही राहणार नाहीत. या ब्रिटनमधील चार वर्षांतल्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुका होत्या. याआधी जून २०१६ मध्ये ब्रेक्झिटवर सार्वमत घेण्यात आले होते.