महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'साध्वी प्रज्ञा सिंह यांचे वक्तव्य वीरमरण आलेल्यांसाठी अपमानकारक आणि लोकशाहीसही घातक'

दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारून माझे सुतक संपवले, असे वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केले होते. मुंबईच्या २६/११ हल्ल्यावरुन आताही राजकारण होते, हे वाईट आहे, असे निकम यांनी म्हटले आहे.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम

By

Published : Apr 19, 2019, 6:37 PM IST

भंडारा -साध्वी प्रज्ञा सिंह यांचे करकरे यांच्याबाबतचे वक्तव्य म्हणजे वीरमरण आलेल्यांचा अपमान आहे, असे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी म्हटले आहे, अशा प्रकारे बोलणे लोकशाहीला घातक आहे. राजकारण्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करण्यापूर्वी आपल्या जिभेला टाळे लावावे, असेही निकम म्हणाले. ते भंडारा येथे माध्यमांशी बोलत होते.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम

दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारून माझे सुतक संपवले, असे वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केले होते. २६/११ चा मुंबई हल्ला हा देशाविरुद्ध होता, ही बाब सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. या हल्ल्यातील मुख्य आरोपी पाकिस्तानी अजमल कसाबनेही न्यायालयासमोर कबुली दिली होती, की तो आणि त्याच्या साथीदार इस्माईलने केलेल्या गोळीबारात करकरे, साळसकर, कामटे हे मृत्युमुखी पडले होते. मात्र, तरीही आज काही राजकारणी व्यक्ती यावरुन राजकारण करत आहेत, असा आरोपही निकम यांनी यावेळी केला.

मुंबईच्या २६/११ हल्ल्यावरून आताही राजकारण होत आहे, हे वाईट आहे. आपल्या संस्कृतीत मरणाऱ्या व्यक्तीसंदर्भात वाईट बोलले जात नाही आणि तरीही काही राजकारणी यावर अशा पद्धतीने भाष्य करीत आहेत, हे खूप चुकीचे आणि लोकशाहीसाठी घातक असल्याचेही निकम म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details