महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उज्जैनमध्ये पोलीस निरीक्षकाचा कोरोनाने मृत्यू

यशवंत अंबर कॉलनी या कंन्टेनमेंट परिसरात कर्तव्यावर असताना पाल यांना कोरोना झाला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

Ujjain Nilganga police
उज्जैन पोलीस

By

Published : Apr 21, 2020, 10:36 AM IST

उज्जैन - मध्य प्रदेशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. लॉकडाऊन काळात दिवस-रात्र काम करणाऱ्या पोलीस विभागालाही कोरोनाने विळखा घातला आहे. उज्जैनच्या नीलगंगा पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत पाल यांचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोनाची लागण झाल्यानंतर पाल यांना इंदुरच्या अरविंदो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यशवंत पाल हे ५९ वर्षांचे होते.

यशवंत अंबर कॉलनी या कंन्टेनमेंट परिसरात कर्तव्यावर असताना पाल यांना कोरोना झाला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पाल यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. पाल यांच्या कुटुंबाला मदत करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details