नवी दिल्ली - केंद्रीय विद्यापीठ आयोगाने सर्व अनुदानित विद्यापीठांना पत्र पाठवले आहे. यामध्ये २१ जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिवसानिमित्त विद्यापीठांमध्ये योगाची प्रात्यक्षिक सादर करण्यास सांगितले आहे.
आंतरराष्ट्रीय योगा दिवसानिमित्त प्रात्यक्षिक सादर करा; युजीसीकडून विद्यापीठांना पत्र - योगा
सर्व अनुदानित विद्यापीठात २१ जूनला सकाळी ७ ते ८ यादरम्यान शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी मिळून योगाची प्रात्यक्षिक करणार आहोत. यावेळी, योगाची प्रात्यक्षिकाचे फोटो आणि व्हिडिओ युजीसीच्या वेबसाईटवर टाकण्यासाठी सांगण्यात आले आहे.
पत्रामध्ये लिहिण्यात आले आहे, की मागील काही वर्षांप्रमाणे आपण यावर्षीही योगा दिवस साजरा करत आहोत. आपण कार्यक्रम आयोजित करून योगाची प्रात्यक्षिके सादर करणार आहोत. याद्वारे आपण योग केल्याने होणारे फायदे समजावून नियमित योगा करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहेत. यासाठी आपण सर्व अनुदानित विद्यापीठात २१ जूनला सकाळी ७ ते ८ यादरम्यान शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी मिळून योगाची प्रात्यक्षिक करणार आहोत.
केंद्रीय विद्यापीठ आयोगाचे सरचिटणीस प्रा. रजनीश जैन याबाबत म्हणाले, २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतो. याआधीही मी २० मार्चला विद्यापीठांना पत्र पाठवून याबाबत कळवले होते. अनुदानित विद्यापीठांनी योगा दिवस साजरा करण्यासाठी योग्य ती तयारी करण्यासाठी हे पत्र पाठवण्यात आले आहे. यासोबतच योगाची प्रात्यक्षिकाचे फोटो आणि व्हिडिओ युजीसीच्या वेबसाईटवर टाकण्यासाठी सांगण्यात आले आहे.