नवी दिल्ली - विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) बुधवारी देशातील २४ स्वतंत्र, अनधिकृत विद्यापीठांची यादी जाहीर केली असून ती सर्व बनावट असल्याचे घोषित केले आहे. यामधील सर्वाधिक विद्यापीठे उत्तर प्रदेशातील असून त्यानंतर दिल्लीचा क्रमांक लागतो.
विद्यार्थी आणि सर्वच नागरिकांच्या माहितीसाठी देशातील २४ विद्यापीठे बनावट असल्याचे घोषित करत आहोत. त्यांना कोणत्याही पदव्या देण्याचा अधिकार नाही. यूजीसी कायद्याचे उल्लंघन केलेल्या विद्यापीठांना बनावट घोषित केल्याचे यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी सांगितले.