अबूधाबी - दोन दिवसीय फ्रान्स दौरा आटोपल्यानंतर पंतपधान नरेंद्र मोदी युएई (संयुक्त अरब अमिरात) मध्ये दाखल झाले आहे. शनिवारी अबूधाबीमध्ये पंतप्रधान मोदी क्रॉऊन प्रिंन्स शेख मोहम्मद बिन जायद यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींना 'ऑर्डर ऑफ जायद' या युएईच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दोन्ही नेते प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
काश्मीरप्रश्नी पाकिस्तान मुस्लीम राष्ट्रांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत असतानाच मोदींना युएईचा सर्वोच्च सन्मान मिळाल्याने पाकिस्तानला धक्का बसला आहे. काश्मीरप्रश्नी भारताने घेतलेला निर्णय चुकीचा नाही, असे युएईचे भारतातील दूतावास अहमद अल बन्ना यांनी म्हटले आहे. तसेच काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचेही युएईने मान्य केले आहे. देशातील प्रादेशिक असमानता संपवण्यासाठी भारताने काश्मीरच्या विभाजनाचा निर्णय घतला आहे. त्यात विशेष असे काही नाही, असेही बन्ना यांनी म्हटले आहे.