नवी दिल्ली - केरळमध्ये तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर 30 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. ही सोन्याची बॅग संयुक्त अरब अमिराती दूतावासाची होती. युएईच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचे नाकारले असून तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
सोने तस्करी प्रकरणातील चौकशीसाठी युएई वाणिज्य दूतावास सहकार्य करण्यास तयार - युएई वाणिज्य दूतावास
केरळमध्ये तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर 30 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. ही सोन्याची बॅग संयुक्त अरब अमिराती दूतावासाची होती. यूएईची भारतातील प्रतिष्ठा डागाळण्याचा हा प्रयत्न आहे. आरोपींना सोडले जाणार नाही. आम्ही या गुन्ह्याच्या मुळाशी जाण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यास कटिबद्ध आहोत, असे संयुक्त अरब अमिरातीच्या दूतावासाने म्हटले आहे.
दोषींनी केवळ मोठा गुन्हा केला नाही. तर यूएईची भारतातील प्रतिष्ठा डागाळण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपींना सोडले जाणार नाही. आम्ही या गुन्ह्याच्या मुळाशी जाण्यासाठी भारतीय अधिकाऱयांना सहकार्य करण्यास कटिबद्ध आहोत, असे संयुक्त अरब अमिरातीच्या दूतावासाने म्हटले आहे.
तिरुअंनतपूरम विमानतळावर तब्बल 30 किलोची सोने तस्करी रविवारी पकडण्यात आली होती. राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सामानामधून ही तस्करी करण्यात आली होती. सीमा शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सरीत कुमार याला तस्करी प्रकरणी अटक केली आहे. तो यापूर्वी संयुक्त अरब अमिरातीच्या वाणिज्य दूतावासात जनसंपर्क अधिकारी होता. या प्रकरणातील दुसरी आरोपी स्वप्ना सुरेश ही फरार आहे. कस्टम विभागाने संबधित महिलेला लूकआऊट नोटीस बजावली आहे.