नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींच्या पुतणीची दिल्लीमध्ये दोन चोरट्यांनी पर्स पळवून नेल्याची घटना घडली आहे. पर्स हिसकावणाऱ्या चोरट्यांचा दिल्ली पोलीस कसून शोध घेत आहे. पोलिसांबरोबर क्राईम ब्रँचही चोरट्यांचा शोध घेत आहे. दोन आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज हाती आले असून लवकरच चोरट्यांना पकडण्यात येईल, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.
पंतप्रधानांच्या पुतणीची पर्स हिसकावून पळालेले चोरटे सीसीटीव्हीत कैद - दमयंती बेन मोदी बातमी
पंतप्रधान मोदींच्या पुतणीची दिल्लीमध्ये दोन चोरट्यांनी पर्स पळवून नेल्याची घटना घडली आहे. पोलिसांबरोबर क्राईम ब्रँचही याप्रकरणी तपास करत आहे.
पंतप्रधान मोदींची पुतणी दमयंती बेन मोदी अमृतसरवरून दिल्ली रेल्वे स्टेशनवर उतरली होती. तेथून सिव्हील लाईन येथील गुजरात समाज सदन येथे ती कुटुंबीयांसह रिक्षाने आली होती. रिक्षातून खाली उतरताच स्कुटीवरून आलेल्या दोन भामट्यांनी तिची पर्स लांबवली.
पर्समध्ये ५० हजार रुपये रोकड, दोन मोबाईल आणि महत्त्वाचे कागदपत्रे ठेवली होती. याप्रकरणी सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन आरोपी दिसून आले आहेत. दोन्ही आरोपी १८ ते २० वर्षांचे असून त्यांनी हेल्मेट घातलेले नाही. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींना पकडण्याच प्रयत्न करत आहेत. स्कूटीचा नंबर मिळाला नसला तरी आरोपींचा कसून शोध सुरू आहे.