कुलगाम (जम्मू आणि काश्मिर) -दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस आणि लष्करांना यश आले आहे. जम्मू आणि काश्मीर राज्यातील कुलगाम जिल्ह्याच्या निपोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळीच चकमक सुरू झाली. या चकमकीत पोलिसांनी २ दहशवतवाद्यांना कंठस्नान घातले असल्याची माहिती काश्मीर पोलिसांनी दिली. सर्च ऑपरेशन अद्याप सुरू आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Terrorist killed
दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस आणि लष्करांना यश आले आहे. जम्मू आणि काश्मीर राज्यातील कुलगाम जिल्ह्याच्या निपोरा भागात पोलिसांनी दहशतवाद्यांना ठार मारले आहे.
दक्षिण काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यात 10 जून रोजी काश्मीर पोलीस आणि जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीर पोलीस आणि जवानांच्या संयुक्त तुकडीने रणनीती आली होती.
एक एप्रिल ते 10 जून पर्यंत 68 दहशतवाद्यांना मारण्यात जवानांना यश आले आहे. देशभर कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन सुरू असताना देशाच्या जवानांनी मात्र या कालावधीमध्ये दहशतवाद्यांना मारण्याची मोहीम फत्ते केली. सुरक्षा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे 35 दहशतवादी मारले गेले आहेत.