महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशातील दोन बड्या काँग्रेस नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी, प्रियंका गांधींवर डागली तोफ - उन्नाव जिल्ह्याचे माजी खासदार अन्नू टंडन

टंडन यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे, की माझ्या राजीनामा देण्याच्या निर्णयाबद्दल राज्यस्तरीय नेतृत्त्वात गैरसमज पसरले आहेत. मी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात माझे वक्तव्य माझ्याकडून शेअर केले जात आहे. माझ्या सर्व हितचिंतकांचे प्रेम आणि आशीर्वाद हवेत. मला गेल्या कित्येक महिन्यांपासून काम करण्याची परवानगी देताना त्यांचा पाठिंबा दिसत नाही.

Two top UP Congress leaders resign, slam leadership
उत्तर प्रदेशातील दोन बड्या काँग्रेस नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

By

Published : Oct 29, 2020, 4:08 PM IST

उन्नाव -उत्तर प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अंकितसिंग परिहार आणि उन्नाव जिल्ह्याचे माजी खासदार अन्नू टंडन या दोन वरिष्ठ नेत्यांनी गुरुवारी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ नेतृत्वावर हल्लाबोल केला. प्रियांका गांधी जेव्हापासून राज्याच्या प्रभारी झाल्या आहेत, तेव्हापासून पक्षाची वैचारिक रचना बदलल्याचा आरोप केला.

कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना दिलेल्या राजीनामा पत्रात परिहार यांनी म्हटले आहे, की तुम्ही राज्याच्या प्रभारी झाल्यापासून काँग्रेस पक्षाच्या वैचारिक रचनेत खुपच बदल झाला आहे. प्रियंका गांधी यांनी काँग्रेस पक्षाची विचारसरणी आणि तत्वे बासनात गुंडाळली आहेत. व्यक्तिशः माझ्या राजकारणाचे ध्येय हे पद, प्रतिष्ठेपेक्षा वरचे आहे आणि ते अधिक वैचारिक व आदर्शवादी आहे.

टंडन यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे, की माझ्या राजीनामा देण्याच्या निर्णयाबद्दल राज्यस्तरीय नेतृत्त्वात गैरसमज पसरले आहेत. मी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात माझे वक्तव्य माझ्याकडून शेअर केले जात आहे. माझ्या सर्व हितचिंतकांचे प्रेम आणि आशीर्वाद हवेत. मला गेल्या कित्येक महिन्यांपासून काम करण्याची परवानगी देताना त्यांचा पाठिंबा दिसत नाही. २०१९ च्या निवडणुकीतील पराभवाचा त्रास तितका वेदनादायक नव्हता, जेव्हा पक्षाची संघटना तुटून पडली. गेल्या काही महिन्यांत मी पक्षातील, राज्य आणि केंद्रातील वरिष्ठ नेत्यांशीदेखील बोललो आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details