महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बडगाममध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार, ४ जवान जखमी

जम्मू काश्मिरमधील बडगाममध्ये सुरक्षा दलाचे जवान दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीमध्ये ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

बडगाममधील सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमक

By

Published : Mar 29, 2019, 8:49 AM IST

Updated : Mar 29, 2019, 10:19 AM IST

श्रीनगर- जम्मू काश्मिरमधील बडगाममध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. ४ जवान जखमी झाले आहेत.

बडमाग जिल्ह्यातील सुत्सू गावात ही चकमक सुरू आहे. या चकमकीत ४ भारतीय जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच जम्मू-काश्मिरमधल्या क्रिष्णा घाटीमधली पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.

दरम्यान, बुधवारीही जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातील केलर परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले होते. त्यावेळी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला होता. सीआरपीएफ, लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या ही मोहिम राबवली होती.

Last Updated : Mar 29, 2019, 10:19 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details