श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दले आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जिल्ह्यातील मांजगाम भागात अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्यावर सुरक्षादलाकडून जोरदार प्रतिउत्तर देण्यात आले.
जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार.. - जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार
सुरक्षा दलांनी दोन दहशदतवाद्यांचा खात्मा केला आहे. या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
Two Terrorists Killed In An Encounter In Kulgam
सैनिकांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा मिळण्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यापूर्वी 15 मार्च रोजी अनंतनाग येथे सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये सुरक्षादलाने 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.