बंगळुरु -राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कर्नाटकातील बंगळुरूमधून दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. या दोघांचा इराण आणि सीरियामधील इस्लामिक स्टेटशी (इसिस) संबंध असल्याचा संशंय आहे.
यापूर्वी 8 ऑक्टोबरला राष्ट्रीय तपास संस्थेनं इस्लामिक स्टेटसाठी काम करणाऱ्या दोघांना बंगळुरुतून अटक केली होती. दोघेही इस्लामिक स्टेटच्या संपर्कात होते आणि त्यांनी इराक, सीरियाचा दौराही केला होता.