महाराष्ट्र

maharashtra

कोरोना : २ आजारी हत्तीसह मृत बिबट्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले

राजाजी नॅशनल पार्कमधील दोन आजारी हत्ती आणि एका मृत बिबट्याचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. राजाजी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने याला केवळ खबरदारीचे पाऊल म्हणून चाचणी करत असल्याचे म्हटले आहे.

By

Published : Apr 20, 2020, 2:41 PM IST

Published : Apr 20, 2020, 2:41 PM IST

२ आजारी हत्ती आणि मृत बिबट्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले
२ आजारी हत्ती आणि मृत बिबट्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले

डेहराडून- न्यूयॉर्कमध्ये एका वाघिणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर जगभरात जंगली प्राण्यांच्या सुरक्षेसंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारनेदेखील सर्व प्राणी संग्रहालयांमध्ये हाय अलर्ट घोषित केला आहे. याच दरम्यान राजाजी नॅशनल पार्कमधील दोन आजारी हत्ती आणि एका मृत बिबट्याचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

राजाजी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने याला केवळ खबरदारीचे पाऊल म्हणून चाचणी करत असल्याचे म्हटले आहे. मात्र, न्यूयॉर्कमध्ये कोरोना संसर्गाचे एक प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे, कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता हे प्रकरण अत्यंत गंभीर मानले जात आहे.

राजाजी नॅशनल पार्कचे संचालक अमित वर्मा यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले, की दोन आजारी हत्ती आणि मृत बिबट्याचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. तसेच कोरोनाबाबत केंद्र शासनाकडून मिळालेल्या सूचनांनुसार खबरदारी घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details