भोपाळ -सिंधिया आणि सिंह ही दोन मध्य प्रदेशच्या राजकारणातील मोठी नावे आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेले ज्योतिरादित्य सिंधिया आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. मध्य प्रदेशच्या ३ जागांपैकी भाजपला २ तर काँग्रेसच्या वाट्याला एक जागा आली आहे.
लोकसभेला पराभवाचा धक्का बसलेले 'हे' २ दिग्गज आता राज्यसभेवर - दिग्विजय सिंह राज्यसभेवर
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसेलेले ज्योतिरादित्य सिंधिया आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांची राज्यसभेवर निवड झाली आहे.
राज्यसभेवर निवड झाल्यानंतर सिंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या नेत्यांचे आभार मानले. सिंधिया आणि दिग्विजय सिंह हे एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी मानले जातात. सिंधिया यांना कोरोनाची लागन झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आपण सर्वांनी सुरक्षित राहावे, मी लवकरच आपल्या सेवेसाठी हजर राहणार असल्याचा व्हिडिओ सिंधिया यांनी शेअर केला आहे.
मध्य प्रदेशातील ३ जागांपैकी भाजपच्या वाट्याला २ तर काँग्रेसला १ जागा मिळाली आहे. भाजपचे उमेदवार ज्योतिरादित्य सिंधिया यांना ५६ तर सुमेरसिंग सोलंकी यांना ५५ मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांना ५७ मते मिळाली.