महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

खबरदार ! माझ्यासमोरून गेला तर...गुजरातच्या बैलाची दहशत, व्हिडिओ व्हायरल - bull attack

एका विजेच्या खांबाआड दबा धरून बसणारा हा बैल येणाऱ्या-जाणाऱ्यांवर अचनाक हल्ला चढवतो.

.गुजरातच्या बैलाचा दहशतीचा व्हिडीओ व्हायरल

By

Published : Jun 19, 2019, 1:58 PM IST

Updated : Jun 19, 2019, 2:20 PM IST

अमहदाबाद - गुजरातमध्ये एका मोकाट बैलाने धुमाकुळ घातला आहे. राजकोट शहरातील एका रस्त्यावर दबा धरून बसलेल्या बैलाने रस्त्याने जाणाऱ्या एका सायकलस्वार आणि दुचाकीस्वाराला जबर धडक दिली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्यांना धडक देणाऱ्या या मुजोर बैलाची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

गुजरातमध्ये एका मोकाट बैलाने धुमाकुळ घातला आहे.

राजकोट शहरातून व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एका रस्त्यावर विजेच्या खांबाआड एक आडदंड बैल उभा असलेला दिसतो. तो बैल आक्रमक असेल अशी शंकाही येत नाही. मात्र, त्या रस्त्याने जाणाऱ्या एका सायकलस्वारावर त्याने जोरदार हल्ला केला. हल्ल्यात बैलाने सायकलस्वाराला खाली पाडले. एवढेच नव्हे तर सायकलस्वारावर पुन्हा ५ मिनिटे थांबून या बैलाने पुन्हा हल्ला केला. त्या व्यक्तीला काही कळण्याच्या आत या बैलाने उचलून खाली आपटले. अचानक झालेल्या हल्ल्याने सायकलस्वार चांगलाच गोंधळून गेला. शिवाय तो या हल्ल्यात गंभीर जखमीही झाला. जवळच असलेल्या एका व्यक्तीने या सायकलस्वाराला बाजूला ओढून नेले. त्यामुळे तो कसबसा वाचला.

एवढ्यावरच हा बैल शांत बसला नाही. तो पुन्हा खांबाआड दबा धरून बसला. त्या रस्त्याने येणाऱ्या एका दुचास्वारावरही त्याने हल्ला चढवला. बैलाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दुचाकीसह रस्त्यावर कोसळला. या रस्त्यावर या बैलाने माजवलेली दहशत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Last Updated : Jun 19, 2019, 2:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details