दिल्ली- येथील डीडीयू रुग्णालयामध्ये विलगीकरण कक्षात काम करणाऱ्या दोन परिचारिकांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. शासनाकडून सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप येथील कर्मचाऱ्यांनी केला आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे वैद्यकीय पथकच कोरोनाच्या धोक्यात असल्याचे दिसत आहे.
राहण्याची व्यवस्था व्हावी
रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दिल्ली शासनाकडून विलगीकरण कक्षात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दवाखान्यातच राहण्याची व्यवस्था त्याचबरोबर जेवणाची व्यवस्था करावी, अशी मागणी येथील कर्मचाऱ्याकडून करण्यात येत आहे. विलगीकरण कक्षात काम केल्यामुळे कोरोना होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच दोन परिचारिकांना कोरोना झाला आहे. यामुळे आपल्या घरी जाताना इतरांनाही कोरोना होऊ शकतो, अशी भीती असल्याने त्यांनी ही मागणी केली.