डेहराडून - उत्तराखंडमधील दोन जिल्हे कोरोनामुक्त झालेले आहेत. यासोबतच ७ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण समोर आला नाही. अशाप्रकारे ९ जिल्हे कोरोनामुक्त आहेत.
उत्तराखंडमधील ९ जिल्हे कोरोनामुक्त; मात्र, डेहराडून रेड झोनमध्ये - कोरोना अपडेट उत्तराखंड
उत्तराखंडमधील पौडी आणि अल्मोडा जिल्ह्यात कोरोनाचे एक-एक रुग्ण सापडले होते. त्यांच्यावर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ७ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही.
राज्यातील पौडी आणि अल्मोडा जिल्ह्यात कोरोनाचे एक-एक रुग्ण सापडले होते. त्यांच्यावर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ७ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही.
डेहराडूनमध्ये दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. हे दोन्ही रुग्ण पश्चिम बंगालचे रहिवासी असून त्यांचा कोरोनाबाधित तबलिगींसोबत संपर्क आल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांना दून वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षामध्ये दाखल करण्यत आले आहे. त्यामुळे राजधानीतील एकूण रुग्णसंख्या ही २२, राज्यात हा आकडा ४४ वर पोहोचला आहे, ९ रुग्णांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.