महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कुमाऊ रेजिमेंटचे दोन जवान बारामुल्लात चकमकीमध्ये शहीद - uttarakhand jawan sacrifices his life

रविवारी दोन्ही जवानांचे पार्थिव हेलिकॉप्टरने राज्यात जिल्हा मुख्यालयात आणण्यात येणार आहेत. जवानांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर दोन्ही गावांमध्ये शोककळा पसरली आहे.

JAWAN MARTYRED
जवान शहीद

By

Published : May 2, 2020, 6:45 PM IST

डेहराडून - श्रीनगरमधील बारामुल्ला जिल्ह्यात पाकिस्तानी लष्करासोबत झालेल्या चकमकीत कुमाऊ रेजिमेंटचे दोन जवान शहीद झाले आहेत. दोन्ही जवान उत्तराखंड राज्यातील पिथौरगड जिल्ह्यातील गंगोलीहाट आणि मुनस्यारी या गावांमधील येथील आहेत. नायक शंकर सिंह महरा आणि गोकर्ण सिंह चुफाल असे शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत.

कुमाऊं रेजिमेंटचे दोन जवान शहीद

रविवारी दोन्ही जवानांचे पार्थीव हेलिकॉप्टरने राज्यात जिल्हा मुख्यालयात आणण्यात येणार आहेत. जवानांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर दोन्ही गावांमध्ये शोककळा पसरली. आज (शनिवारी) पाकिस्तानी लष्करासोबत झालेल्या चकमकीत दोघांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह यांनी जवानांच्या मृत्यूनंतर दु:ख व्यक्त केले. राज्य सरकारद्वारे शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात येणार असल्याचे सिंह यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details