महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

विषारी मशरूम खाल्ल्यामुळे दोघांचा मृत्यू, शिलॉंगमधील एकूण मृतांचा आकडा चार वर.. - जंगली मशरूम शिलॉंग

शिलॉंगच्या लामिन गावामधील तीन कुटुंबातील लोकांनी जंगली मशरूम खाल्ले होते. यामुळे एकूण १८ जणांना विषबाधा झाली होती. यांपैकी चौघांचा दुर्दैवी अंत झाला आहे. गावाचे प्रमुख गशेंगा यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल झालेल्या मृत्यूंमध्ये सिनरन खोंगला (१६) आणि लापिंशी खोंगला (२८) यांचा समावेश होता.

Two more persons die after consuming wild mushrooms
विषारी मशरूम खाल्ल्यामुळे दोघांचा मृत्यू, शिलॉंगमधील एकूण मृतांचा आकडा चार वर..

By

Published : Apr 30, 2020, 11:06 AM IST

शिलॉंग : भारत-बांगलादेशच्या सीमेवरील एका गावामध्ये विषारी मशरूमचे दोन नवे बळी आढळून आले. यामुळे या मशरूमच्या एकूण बळींची संख्या चारवर पोहोचली आहे.

शिलॉंगच्या लामिन गावामधील तीन कुटुंबातील लोकांनी जंगली मशरूम खाल्ले होते. यामुळे एकूण १८ जणांना विषबाधा झाली होती. यांपैकी चौघांचा दुर्दैवी अंत झाला आहे. गावाचे प्रमुख गशेंगा यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल झालेल्या मृत्यूंमध्ये सिनरन खोंगला (१६) आणि लापिंशी खोंगला (२८) यांचा समावेश होता. याआधी मृत पावलेल्या कातदिलिया खोंगला (२६) याचे ते भाऊ-बहीण होते. यासोबतच, यापूर्वी त्यांचे शेजारी मॉरिसन धार (४०) यांचेही विषारी मशरूम खाल्ल्याने निधन झाले होते.

या सर्वांवर नॉर्थ इस्टर्न इंदिरा गांधी रीजनल इन्स्टिट्यूट ओफ हेल्थ अँड मेडिकल सायन्स (एनईआयजीआरआयएचएमएस) या ठिकाणी उपचार सुरू होते. यासोबतच, कातदिलियाच्या आणखी दोन भावंडांवरही त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत. तर, आणखी तिघांना इयालॉंगच्या जोवाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, एका सात वर्षाच्या बाळाला उपचारांसाठी शिलॉंगच्या वूडलँड रुग्णालायत हलवण्यात आले आहे.

हेही वाचा :आसाम सरकार कर्मचार्‍यांना संपूर्ण वेतन देणार, कपात नाही

ABOUT THE AUTHOR

...view details