श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सोमवारी भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक घडली. यामध्ये भारतीय जवानांना 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. कुलगाम पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि राष्ट्रीय रायफल्सने मिळून कामगिरी केली आहे. दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे पोलीस अधिकारी विजय कुमार यांनी सांगितले.
जम्मू कश्मीरच्या कुलगाममधील चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा - Kulgam encounter
दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून जवानांनीही गोळीबार सुरू केला. ज्यामध्ये 2 दहशतवादी ठार झाले.
जम्मू
दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर संयुक्त पथकाद्वारे परिसरामध्ये शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी जवानांच्या पथकावर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यावर ही चकमक सुरू झाल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून जवानांनीही गोळीबार सुरू केला. ज्यामध्ये 2 दहशतवादी ठार झाले.