श्रीनगर -जम्मू काश्मीरमधील शोपियानमधील किल्लोरा गावात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यामध्ये चकमक झाली. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा सुरक्षा दलाने केला आहे.
जम्मू-काश्मीर : शोपियान जिल्ह्यात चकमकीत 2 दहशतवादी ठार - militants killed in encounter
- जम्मू काश्मीरमधील शोपियानमधील किल्लोरा गावात भारतीय सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.
परिसरामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. माहितीनुसार सुरक्षा दलाकडून शोधमोहिम राबवण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार करताच, भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले आहेत.
पाकिस्तानात दहशतवाद्यांचे तळ अॅक्टिव्ह असून तेथील दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. मागील काही दिवसात असे अनेक प्रयत्न सुरक्षा दलांनी उथळून लावले आहेत. 2020 मध्ये आत्तापर्यंत 130 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.