पुलवामा (जम्मू-काश्मिर) -येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांना जवळपास दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. दक्षिण काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यातील दादुरा परिसरात ही चकमक झाली.
अहवालानुसार, अतिरेक्यांच्या उपस्थिती माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांच्या संयुक्त पथक, सैन्य आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) दादूरामध्ये एक शोध-शोध-मोहीम सुरू केली. यानंतर संयुक्त पथकाने संशयित जागेला घेराव घातला. यावेळी लपलेल्या अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केल्यानंतर ही चकमक झाली.
अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात यश आले आहे. अद्याप त्यांची ओळख समजू शकली नाही. दरम्यान, चकमकीच्या ठिकाणी अजूनही शोधमोहीम सुरू आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी दोन स्वयंचलित रायफल्ससह गुन्हेगारी साहित्य, शस्त्रे व दारूगोळा जप्त केला आहे.
गेल्या 12 तासांतील दक्षिण काश्मिरमधील ही दुसरी चकमक आहे. याआधी कुलगाम येथे सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घातले. दरम्यान, आदल्या दिवशी उत्तर काश्मीरच्या केरन सेक्टर येथे तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांनी पीओकेतून शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न रोखला, अशी माहिती भारतीय सैन्याने दिली.