मुझफ्फरपूर- राष्ट्रीय जनता दलाच्या दोन नेत्यांवर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला आहे. बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात ही घटना घडली. या गोळीबारात दोन्हीही नेते गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बिहारमध्ये जंगलराज, राजदच्या दोन नेत्यांवर गोळीबार - Muzaffarpur
शुक्रवारी पहाटे ही घटना घडली आहे. या दोन्ही नेत्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
राजदच्या दोन नेत्यांवर गोळीबार
मुझफ्फरपूर शहरातील कांटी पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली. या घटनेत राजदचे सुरेंद्र यादव आणि उमाशंकर प्रसाद हे जखमी झाले आहेत. उमाशंकर यांना ४ गोळ्या लागल्या असून दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे.
Last Updated : Jun 14, 2019, 9:23 AM IST