नवी दिल्ली :दिल्लीच्या आदर्शनगर भागात असलेल्या एका कारखान्यातील सेप्टिक टँक साफ करताना २ कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला तर, इतर ३ कामगारांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. इजरीस आणि सलीम अशी मृत्यू झालेल्या मजुरांची नावे आहेत.
दिल्ली : सेप्टिक टँक साफ करताना ६ कामगारांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी - सेप्टीक टँकमध्ये दोन मजुरांचा मृत्यू बातमी
दिल्लीच्या आदर्शनगर भागात असलेल्या एका कारखान्यातील सेप्टिक टँकच्या सफाईदरम्यान २ कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला तर, ३ कामगारांची प्रकृती गंभीर आहे. तिघांना बाबू जगजीवन राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
![दिल्ली : सेप्टिक टँक साफ करताना ६ कामगारांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी सेप्टिक टँक साफ करताना ६ कामगारांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9230076-thumbnail-3x2-delhi.jpg)
आदर्शनगर भागातील लालबागच्या हंस सिनेमागृहाजवळ सोन्याची चेन तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यातून निघणाऱ्या केमिकलला या सेप्टिक टँकमध्ये टाकले जात असल्याची माहिती आहे. ही टँक जवळपास २० फूट खोल आहे. रविवारी या टँकच्या सफाईसाठी ५ कामगारांना बोलवण्यात आले होते. सफाईदरम्यान तीन कामगार टँकमध्ये उतरले. मात्र, बराच वेळ झाला तरी, ते बाहेर न आल्यामुळे उर्वरित दोन कामगार त्यांना पाहण्यासाठी टँकमध्ये उतरले. पण यात त्या दोघांचा मृत्यू झाला तर, तीन कामगार हे अत्यवस्थ आहेत. तीन कामगारांना बाबू जगजीवन राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा -सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान जखमी