कोलकाता- पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगन्यातील कनकिनारामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात २ जणांचा मृत्यू झाला. तर, ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
पश्चिम बंगालमध्ये बॉम्बस्फोट; २ ठार, ४ जखमी - भाजप
भाजप-तृणमूलच्या कार्यकर्त्यांत चालू असलेल्या वादामुळे सध्या बंगालमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगालमध्ये दिवसेंदिवस हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
यासंदर्भात बोलताना स्थानिकांनी सांगितले, की काही अनोळखी लोकांनी काल रात्री हा बॉम्ब लावला होता. यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली होती. काही भागात दरोडे पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यासाठी आम्ही सरकारी यंत्रणेकडे मदतीची मागणी केली आहे.
भाजप-तृणमूलच्या कार्यकर्त्यांत चालू असलेल्या वादामुळे सध्या बंगालमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगालमध्ये दिवसेंदिवस हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यात काहीजणांचा मृत्यू झाला आहे. तर, काहीजण गंभीर जखमी आहेत. त्यामुळे, येथे कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.