श्रीनगर - आज जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कुपवाडा येथून अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून 7 लाख रोख रक्कम जप्त करण्यात आली असून तपास सुरू असल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली. तसेच संबधित परिसरामध्ये शोधमोहिमेसाठी तपास पथके रवाना करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
कुपवाडामधून जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक - Jaish-e-Mohammed terrorists arrested
आज जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कुपवार येथून अटक करण्यात आली आहे.
कुपवारा
दरम्यान, आज सकाळी जम्मू काश्मीरमधील बारामुल्लामध्ये सुरक्षा दलाने मोठ्या सतर्कतेने आयईडी बॉम्ब शोधून काढत तो निकामी केला. जिल्ह्यातील वाटरगाम येथील मुख्य रस्त्यांवरून पोलिसांनी आणि सुरक्षादलाने आयईडी बॉम्ब शोधून काढला.
आयईडी बॉम्ब आढळल्यानंतर मुख्य रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली असून बॉम्ब शोधक नाशक पथकाने तो निकामी केला आहे. सुरक्षा दलाला लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांनी बॉम्ब पेरून ठेवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.