श्रीनगर- मंगळवारी रात्री पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात गोळीबार करण्यात आला. ज्यात एकाच कुटुंबातील दोघे जखमी झाले आहेत. यात एका १० वर्षीय मुलीचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी या हल्ल्याबद्दलची माहिती दिली आहे.
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, राजौरीतील २ नागरिक जखमी - राजौरीतील २ नागरिक जखमी
मांजाकोटे सेक्टरमधील राजधानी परिसरातील लामीबारी गावातील नाझीर हुसेन यांच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघे जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हल्ल्यात जखमी झालेल्या ७० वर्षीय रफिक खान आणि सोनिया शबीर यांना स्थानिक पोलिसांनी बचावले आणि राजौरीच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
पाकिस्तानने मांजाकोटे सेक्टरमधील राजधानी परिसरातील लामीबारी गावातील नाझीर हुसेन यांच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघे जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हल्ल्यात जखमी झालेल्या ७० वर्षीय रफिक खान आणि सोनिया शबीर यांना स्थानिक पोलिसांनी बचावले आणि राजौरीच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
पाकिस्तानकडून मंगळवारी रात्री उशिरा पुंछ जिल्ह्यातील बालाकोटे आणि मेंढर या भागातील गावांवरही हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले. मंगळवारी काही तास ही चकमक सुरू होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.