महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारत-चीन तणाव : लडाखमध्ये दोन लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर तैनात

चीनबरोबर सध्या सीमेवर तणाव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) ने विकसित केलेले दोन लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर लेहमध्ये तैनात केले आहेत.

हेलिकॉप्टर
हेलिकॉप्टर

By

Published : Aug 14, 2020, 7:19 AM IST

नवी दिल्ली - चीनबरोबर सध्या सीमेवर तणाव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) ने विकसित केलेले दोन लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर लेहमध्ये तैनात केले आहेत. एचएएलचे हे दोन हेलिकॉप्टर मिशनमध्ये आयएएफला मदत करतील.

लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स हे एक अत्याधुनिक आहे. यामध्ये अत्याधुनिक यंत्रणा असून हे अत्यंत अचूक निशाणा साधू शकते. हिलकॉप्टर्स दिवसा किंवा रात्री कोणत्याही प्रकारच्या लक्ष्यावर विजय मिळविण्यास सक्षम आहेत. तसेच विविध परिस्थितीत पुरेसा शस्त्र भार वाहण्याची क्षमता त्यात आहे.

आयएएफ आणि भारतीय सैन्य मिळून सुमारे 160 लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरची आवश्यकता आहे. सध्या डिफेंस एक्‍विजिशन काउंसिल (डीएसी)ने असे 15 हेलिकॉप्टर विकत घेण्यास मान्यता दिली आहे. यापैकी 10 हे भारतीय वायुसेना तर 5 भारतीय लष्कराला दिले जातील.

हे हेलिकॉप्टर एकमेव असे हेलिकॉप्टर आहे, जे सियाचीनसारख्या दुर्मिळ उंची असलेल्या ठिकाणांवरही कार्य करण्यास समक्ष असल्याचा दावा एचएएलने केला आहे. याला भारतीय वायुसेनेच्या गरजा लक्षात घेत बनवण्यात आले आहे. वजनाने हलके असलेले हे लढाऊ हेलिकॉप्टर विपरित परिस्थितीतही उडू शकतं. त्यासोबतच खालच्या उंचीवरही उडू शकतं.

ABOUT THE AUTHOR

...view details