महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

22 देशांची यात्रा करत 2 दुचाकीस्वार लंडनहून आले भारतात - दुचाकीस्वार

बर्‍याचवेळा बातम्यांमधून एखाद्या ठिकाणी एखादी घडत असलेली घटना वाचतो, ऐकतो. त्यावेळी आम्हाला वाटले की, आपण घटनास्थळी जाऊन काय घडत आहे ते पाहावे. म्हणून या युवकांनी प्रवासाला सुरूवात केली.

2 दुचाकीस्वार लंडनहून आले भारतात

By

Published : Aug 20, 2019, 12:06 PM IST

नवी दिल्ली - माध्यमातून छापलेले किंवा दर्शविले खरे असते का? हे पाहण्यासाठी लंडनमधील 2 तरुण 22 देशातून प्रवास करत भारतात आले आहेत. कुरियन फिलिप्स आणि जेसस अशी या युवकांची नावे आहेत. दोघांनीही लंडनच्या संसदेपासून भारतीय संसदेपर्यंत दुचाकीवरून प्रवास केला आहे.

कुरियन आणि जेससने 22 देशांमधून 19 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. हा प्रवास करून ते दोघे जेव्हा नोएडाला पोहोचले तेव्हा त्यांचा दृष्टीकोन बदलला आहे. त्याबरोबर त्यांना सर्वत्र आपल्यासारखेच आणि मदत करणारे लोक असल्याचे लक्षात आले आहे.

2 दुचाकीस्वार लंडनहून आले भारतात

प्रसार माध्यमाशी शेअर केले प्रवासाचे अनुभव -

या दोन्ही तरूणांनी दुचाकीवरून 22 देशात प्रवास केला आहे. त्यानंतर ते आता भारतीय संसद भवन येथे जाणार आहेत. नोएडा येथे पोहोचल्यावर त्यांचे पुष्पहार घालून आणि मिठाई देऊन स्वागत करण्यात आले. आता ते भारताच्या संसदेत जाऊन मुंबईमार्गे लंडनला परतणार आहेत. नोएडाच्या प्रवासादरम्यान दोघांनीही प्रवासाचे आपले अनुभव माध्यमांशी शेअर केले.

कुरियन फिलिप्स, दुचाकीस्वार

सर्व देशांनी केली मदत -

बर्‍याचवेळा बातम्यांमधून एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडत असल्याचे वाचतो, ऐकतो. त्यावेळी आम्हाला वाटले की, आपण घटनास्थळी जाऊन काय घडत आहे ते पाहावे. म्हणून आम्ही प्रवासाला सुरूवात केली. ज्या बातम्या वाचतो, त्यामध्ये सत्य आहे, असे आम्हाला आढळले. मात्र, ज्या-ज्या देशात तेथील लोकांनी आम्हाला मदत केली, कुरियनने सांगितले.

माझ्या आयुष्याची 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे हे स्मरणात राहण्यासाठी या सहलीचे आयोजन केले, असल्याचे कुरियन यांनी सांगितले. त्याबरोबरच ज्या-ज्या देशात गेलो, त्या ठिकाणी लोक नेहमीच मदत करण्यास तयार असतात. ज्यावेळी काही समस्या असेल लोकांनी मदत केल्याचेही कुरियनने सांगितले.

जेसस, दुचाकीस्वार

प्रथमच दुचाकीवरून भारतात-

मी लंडनमध्ये 20 वर्षांपासून राहत आहे. 3 ते 4 वेळा बाईक ट्रिपवर दक्षिण आफ्रिकेत फिरलो आहे. दुचाकीवरून प्रवास करणे ही माझी आवड आहे. मी 3-4 वेळा भारतात आलो आहे. मात्र, दुचाकीवरून पहिल्यांदाच भारतात आल्याचे जेससने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details