जयपूर : महाराष्ट्रात पार पडलेला एक विवाह सध्या जयपूरमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. जयपूरमधील एका मुलीने पळून येऊन महाराष्ट्रातील मंदिरात विवाह केला. मात्र, तिच्या पळून जाण्यामुळे हा विवाह चर्चेत नाही आला. तो चर्चेत आलाय, कारण तिने कोणा तरुणाशी नाही, तर एका तरुणीशी लग्न केले आहे. या प्रकारानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली असून, जयपूर पोलिसांनी दोन्ही तरुणींना महाराष्ट्रातून ताब्यात घेतले आहे.
फेसबुकवर झाली ओळख..
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरच्या या तरुणीची महाराष्ट्रातील तरुणीशी फेसबुकवरुन ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. यानंतर, महाराष्ट्रातील या तरुणीने जयपूरला जात, आपल्या मैत्रिणीला महाराष्ट्रात आणले. इथे या दोघींनी लग्न केले.