जयपूर- राजस्थानमध्ये सध्या सुरू असलेल्या आमदारांच्या घोडेबाजाराबाबत गुरुवारी संध्याकाळी सोशल मीडियावर एक ऑडियो क्लिप व्हायरल झाली. त्यांनतर काँग्रेसचे गटनेता महेश जोशी यांनी एसओजीकडे दोन तक्रारी दाखल केल्या आहेत. महेश जोशींकडून आलेल्या तक्रारीच्या आधारे एसओजी मुख्यालयात दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल होताच एसओजीने तपास सुरू केला आहे.
राजस्थान सत्ता संघर्ष : घोडेबाजार प्रकरणात दोन एफआयआर दाखल... - Mahesh Joshi Rajasthan
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिपच्या आधारे दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपच्या आधारे सरकारचे मुख्य गटनेता जोशी यांनी एसओजीला दोन तक्रारी दिल्या.
मुख्य गटनेता महेश जोशींच्या तक्रारीनंतर दोन एफआयआर दाखल...
एडीजी एसओजी अशोक राठोड यांनी सांगितले की, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिपच्या आधारे दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपच्या आधारे सरकारचे मुख्य गटनेता जोशी यांनी एसओजीला दोन तक्रारी दिल्या. त्या आधारे एसओजीने एफआयआर नोंदविला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची चौकशी केली जात आहे.
Last Updated : Jul 17, 2020, 2:01 PM IST