सीरसा - पंजाब पोलिसांनी मादक पदार्थांची तस्करी करणारा रणजीत राणा चिताला अटक केली आहे. हरियाणामधील सिरसा येथे ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्यावर्षी जूनमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवरुन 532 हेरॉईनची तस्करी केल्याप्रकरणी त्यांचा शोध सुरु होता.
हेरॉईनची तस्करी करणाऱ्या रणजीत राणाला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई - हेरॉईनची तस्करी
अमली पदार्थ तस्करी करणारे रणजित राणा चीता आणि त्याचा भाऊ गगनदीप भोला यांना हरियाणाच्या सिरसा येथून पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. दोघांना सिरसा येथील बेगु गावातून अटक करण्यात आली आहे.
अंमली पदार्थ तस्करी करणारे रणजित राणा चीता आणि त्याचा भाऊ गगनदीप भोला यांना हरियाणाच्या सिरसा येथून पंजाब पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पंजाबचे डीजीपी दिनकर गुप्ता यांनी शनिवारी दिली. दिनकर गुप्ता यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती दिली की, या दोघांना सिरसा येथील बेगु गावातून अटक करण्यात आली आहे.
30 जून, 2019 ला सीमा शुल्क विभागाने अटारी सीमेवर जवळपास 2 हजार 600 कोटी ऐवढी किमंत असलेले 532 ग्राम हेरॉईन जप्त केले होते. पाकिस्तानातून येत असलेल्या सेंधा मिठाच्या थैल्यांमध्ये ते लपवण्यात आले होते.