कुरुक्षेत्र - प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसने अचानक पेट घेतल्याची घटना हरियाणातील पीपलीमध्ये घडली. यामध्ये २ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर, १५ प्रवासी जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री ही घटना घडली.
प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसला आग, दोघांचा मृत्यू तर १५ जखमी - 2 killed
वासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसने अचानक पेट घेतल्याची घटना हरियाणातील पीपलीमध्ये घडली. यामध्ये २ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर, १५ प्रवासी जखमी झाले आहेत.
खासगी बसला आग
१४ ते १५ प्रवाशांवर लोकनायक जयप्रकाश जिल्हा रुग्णालय कुरुकक्षेत्र येथे उपचार सुरू आहेत. यामध्ये २ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती नितीन कलरा यांनी दिली आहे. बसला लागलेली आग ही इतकी भयंकर होती की, यामध्ये बस संपूर्ण जळून खाक झाली आहे.