मथुरा- यमुना एक्सप्रेस हायवेवर पुन्हा एकदा अपघात झाला आहे. खासगी बसला एका अज्ञात ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला असून पाच गंभीर जखमी झाले आहेत. बस चालक लल्लू (40) आणि हेल्पर सत्यप्रकाश (वय 22) असं मृत व्यक्तींची नावे आहेत.
यमुना एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू - dead
खाजगी बसला एका अज्ञात ट्रकने धडक दिली आहे. यात दोघांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

भीषण अपघात
यमुना एक्सप्रेस हायवेवर अपघात
खासगी बस मध्यप्रदेशच्या मुरैना पासून दिल्लीला जात होती. यावेळी रविवारी सकाळी महावन पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात झाला. यात धडक देणाऱ्या ट्रक चालकाने घटना स्थळावरुन पळ काढला आहे. अपघातात बस चालक आणि हेल्परचा मृत्यू झाला असून पाच प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.