नवी दिल्ली -गुरुग्राम सेक्टर येथील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर एका कोरोना संशयित महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. दोन्ही पोलीस नशेत होते, असे पीडित महिलेने म्हटले आहे. शहरातील पॉलीक्लिनिक येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ही घटना घडली.
क्वारंटाईन सेंटरमध्ये पोलीस कर्मचाऱयाकडून महिलेचा वियनभंग
गुरुग्राम सेक्टर येथील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर एका कोरोना संशयित महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.
सीएमओच्या तक्रारीनंतर गुरुग्राम पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून दोघांना निलंबित केले आहे. वास्तविक, ही घटना काल रात्री उशिरा दोन वाजण्याच्या सुमारास घडली. ड्युटीवर असलेले पोलीस, राजेश आणि विजेंद्र नशेत क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल झाले. त्यांनी महिलेची छेड काढण्यास सुरवात केली.
महिलेने आरडाओरडा करताच सेंटरमधील आरोग्य आणि वैद्यकीय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोघांनाही ताब्यात घेतले.