श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. आज दुपारी पूंछ जिल्ह्यातील शाहापूर आणि किरीनी सेक्टर भागात पाककडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून इतर ७ जण जखमी झाले आहेत.
हेही वाचा -'एसपीजी सुरक्षा हा 'स्टेटस' होता कामा नये; गांधी परिवाराची सुरक्षा काढली नाही, बदलली'
शाहापूर आणि किरीनी सेक्टर भागात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत होता. त्याला भारतीय लष्कराकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार सुरू होता. लहान शस्त्रे आणि तोफगोळ्यांनी मारा केला. या हल्ल्यात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला, तर इतर ७ जण जखमी झाले आहेत, असे सुरक्षा प्रवक्त्याकडून सांगण्यात आले.
जखमी नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या या गैरकृत्याला भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. या भागात अद्यापही चकमक सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.