हैदराबाद- तेलंगणा बोर्ड ऑफ इंटरमीजिएट एज्युकेशनचा (टीबीआयईई) अजब कारभार समोर आला आहे. शिक्षण विभागाकडून मुलीचा निकाल पास असा दाखवण्यात आल्यानंतर काही तासानंतर नापास निकाल देण्यात आला. यामुळे निराश झालेल्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना घटना घडली आहे. निकाल लागल्यापासून आतापर्यंत २३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे.
तेलंगणा शिक्षण मंडळाचा अजब कारभार; चुकीच्या निकालामुळे आतापर्यंत २३ विद्यार्थ्यांची आत्महत्या
शिक्षण विभागाकडून मुलीचा निकाल पास असा दाखवण्यात आल्यानंतर काही तासानंतर नापास निकाल देण्यात आला. यामुळे निराश झालेल्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना घटना घडली आहे.
हैदराबाद येथील प्रगती महाविद्यालयात शिकणारी अकरावीची विद्यार्थीनी अनामिका अरुतला हिचा निकाल पहिल्यावेळेस पास असा दाखवण्यात आला होता. तिला तेलुगु विषयात ४८ गुण दाखवण्यात आले होते. तर, इंग्रजी ६४ गुण, तेलुग ४८, अर्थशास्त्र ५५, नागरिकशास्त्र ६७ आणि वाणिज्य विषयात ७५ गुण मिळाल्याचे दाखवण्यात आले होते. परंतु, कालांतराने बोर्डाकडून निकाल बदलण्यात आला आणि तिला तेलुगु विषयात ४८ नाही तर, २१ गुण मिळवल्याचे दाखवण्यात आल्याने तिचा निकाल नापास असा दाखवण्यात आला. यामुळे निराश होवून अनामिकाने आत्महत्या केली होती. यामुळे व्यथित झालेल्या अनामिकाच्या परिवाराने शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. अनामिका मोठी बहिण उदया म्हणाली, शिक्षण मंडळ त्यांचे काम करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
तेलंगाणा शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावर बोलताना म्हटले आहे, की आत्महत्या केलेल्या २३ विद्यार्थ्यांचे निकाल बरोबर असून त्यांच्यातील एकही विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाला नाही.