महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

LIVE : भारत-चीन सीमेवर झटापट; तब्बल २० भारतीय जवानांना वीरमरण.. - india china relations

भारत-चीन सीमेवर सोमवारी मध्यरात्री दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापट झाली. यामध्ये भारताच्या वीस जवानांना वीरमरण आले. तसेच चीनच्या सैन्यामधील काही जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. याच झटापटीत तामिळनाडूमधील पाळनी यांना वीरमरण आले.

twenty soldier martyr
LIVE : भारत-चीन सीमेवर झटापट; तब्बल २० भारतीय जवानांना आले वीरमरण..

By

Published : Jun 16, 2020, 1:24 PM IST

Updated : Jun 17, 2020, 4:52 AM IST

  • 2:05 AMसीमेवरील गलवान येथील चिन आणि भारतीय सैनिक यांच्यात सुरू असलेल्या हिंसक संघर्षावरुन संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सरचिटणीसांनी चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी संयम ठेवला पाहिजे असेही त्यांनी नमुद केले आहे.

भारत-चीन के बीच खूनी संघर्ष पर गुटेरेस चिंतित, बोले- संयम रखें दोनों देश

  • 9:55 PM : भारत-चीन सीमेवरली गलवान येथील दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झालेल्या झटापटीत चीनचे सुमारे ४३ जवान ठार झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये गंभीररित्या जखमी असलेल्या जवानांचाही समावेश आहे.
  • 9:50 PM : भारत-चीन सीमेवरली गलवान येथील दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झालेल्या झटापटीत तब्बल वीस जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एका लष्करी सूत्राने ईटीव्ही भारतला ही माहिती दिली आहे. याआधी तीन जवानांना वीरमरण आल्याची माहिती मिळाली होती, मात्र आता ही संख्या तब्बल वीसवर पोहोचली आहे. यासोबतच देशाचे १० जवान हे बेपत्ता असल्याचेही सांगण्यात येत आहे.

नवी दिल्ली - भारत-चीन सीमेवरील गलवान येथे दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झटापट झाली असून यामध्ये तीन जवानांना वीरमरण आले आहे. यामध्ये एका भारतीय लष्कर अधिकाऱ्यासह दोन जवानांचा समावेश आहे. यापैकी एक जवान तेलंगणा, तर एक तामिळनाडूमधील, एक झारखंड येथील रहिवासी आहे.

भारत-चीन सीमेवर १९७५नंतर पहिल्यांदाच जीवितहानी -

हल्ला झालेले गलवान खोरे हे १९६२पासून भारताच्या ताब्यात आहे. मात्र, सोमवारी मध्यरात्री या ठिकाणी भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झटापट झाली. यामध्ये तीन जवानांना वीरमरण आले. १९७५नंतर पहिल्यांदाच भारत-चीन सीमेवर झालेली ही पहिलीच जीवितहानी आहे.

भारत-चीन सीमेवरील झटापटीमध्ये तामिळनाडूच्या जवानाला वीरमरण -

भारत-चीन सीमेवर सोमवारी मध्यरात्री दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापट झाली. यामध्ये भारताच्या तीन जवानांना वीरमरण आले. तसेच चीनच्या सैन्यामधील काही जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. याच झटापटीत तामिळनाडूमधील पाळनी यांना वीरमरण आले. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. ते गेल्या २२ वर्षांपासून भारतीय लष्करामध्ये सेवा देत होते. तसेच त्यांचा भाऊ देखील लष्करामध्ये असून सध्या राजस्थान येथे सेवा देत आहे. पाळनी यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परवार आहे.

चीनच्या उलट्या बोंबा -

भारतीय सैन्याने सोमवारी दोनदा नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून चिनी सैन्यावर हल्ला केला. यामध्ये काही जवान जखमी झाले आहेत, असा आरोप चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला आहे. तसेच एकतर्फी कारवाईला आळा घालण्यासंबंधी भारताला विनंती केली. भारत आणि चीन यांच्यामधील सीमावाद शांततापूर्ण मार्गाने चर्चा करून सोडविण्यासाठी दोन्ही बाजूने सहमती दर्शवली होती. आम्ही संबंधित कराराचे पूर्णपणे पालन करत आहोत. मात्र, यानंतर भारताने त्यांच्या सैन्यावर अंकुश ठेवावा, असेही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

सीमावर्ती भागात तणाव -

गेल्या महिन्यापासून चीनने भारताविरोधात सीमेवर कुरघोड्या करण्यास सुरुवात केली. गलवान व्हॅली आणि पॅन्गाँन्ग लेक वर चीनने आपला दावा केला. यानंतर ६ जूनला दोन्ही देशांतील लष्कराच्या लेफ्टनंट जनरलपदावरील अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली. यानंतर ९ तारखेला देखील बैठक घेण्यात आली. लडाख प्रांताच्या पूर्वेला असणाऱ्या चीनच्या चुशूल-मोल्दो भागात ही भेट झाली. उभयतांनी सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला. दरम्यान, चीनने सीमावर्ती पर्वतीय भागात मोठ्या प्रमाणात सैन्य आणि आर्टिलरी तैनात केली होती. चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या 'ग्लोबल टाइम्स' या वृत्तपत्रातून भारताविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये करण्यात आली होती. शांतता कायम ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठका पार पडत होत्या.

झटापटीसंबंधी सर्व घडामोडी -

  • सायं ७.३० - झटापटीमध्ये वीरमरण आलेला तिसरा जवान हा झारखंडमधील रहिवासी होता.
  • सायं. ५.१६ - सोमवारी रात्री झालेल्या झटापटीमध्ये तेलंगणामधील सूर्यापेठ येथील बी. संतोष बाबू या जवानाला वीरमरण आले असून ते कर्नल रँकचे अधिकारी होते.
  • दु. ३.२७ - सोमवारी घडलेल्या प्रकाराचा चीनने निषेध नोंदवला असून आम्ही संबंधित कराराचे पालन करीत आहोत. मात्र, भारतीय सैन्याने सीमारेषा ओलांडू नये. तसेच भारताने त्यांच्या सेनेवर अंकुश ठेवावा, अशी मागणी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिअन म्हणाले.
  • दु. २.४४ वीरमरण आलेला एका जवानाचे नाव पाळनी असून तो तामिळनाडूच्या रामनाथपुरम येथील आहे.
  • दु. २.२८ - लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांची पठाणकोट येथील लष्करी तळावरील नियोजित भेट रद्द करण्यात आली आहे. - सूत्र
  • दु. १.५९ - सोमवारी रात्री झालेल्या झटापटीच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीन या दोन्ही देशांचे मेजर जनरल गलवान खोरे, लडाख आणि इतर सीमावर्ती भागातील तणावपूर्ण परिस्थिती हातळण्याबाबत चर्चा करणार आहेत - सूत्र
  • दु. १.५० - भारतीय सैन्याने सोमवारी दोनदा नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून चिनी सैन्यावर हल्ला केला. यामध्ये काही जवान जखमी झाले आहेत, असा आरोप चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला आहे. तसेच एकतर्फी कारवाईला आळा घालण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. भारत आणि चीन यांच्यामधील सीमावाद शांततापूर्ण मार्गाने चर्चा करून सोडविण्यासाठी दोन्ही बाजूने सहमती दर्शवली होती. त्यानंतर हे घडले असल्याचे ते म्हणाले.
  • दु. २.२० - गोळीबार झाला नसून फक्त हिंसक हल्ला आणि दगडफेकीमुळे भारताच्या तीन जवानांना वीरमरण आले - ओमर अब्दुल्ला
  • दु. १.४३ - भारत आणि चीन दोन्ही बाजूचे जवान जखमी झाले आहेत.
  • दु. १.४१ - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची लष्कराचे अधिकारी बिपिन रावत, तीन सेवा प्रमुख आणि परराष्ट्र्मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत बैठक घेतली. याबाबत पूर्ण लडाखमधील परिस्थितीवर चर्चा केली होती.
  • दु. १.३४ - एका वृतसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारताने सीमेचे उल्लंघन करून चीनच्या जवानांवर हल्ला केल्याचा आरोप चीनने केला आहे.
  • दु. १.१८ - लष्कराची पत्रकार परिषद होण्याची शक्यता असून सीमेवरील तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्याबाबत माहिती देण्यात येणार आहे.
Last Updated : Jun 17, 2020, 4:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details